महाराष्ट्र
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची एकजूट

माळीनगर ——-प्रतिनिधी रियाज मुलाणी.
मो. 99 21 500 780
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बिहार मधील पाटण्यामध्ये आज देशातील सर्व भाजप विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये 15 पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून 2024 लोकसभा निवडणूक सर्व विरोधकांचे एकत्र लढण्यावर एकमत झाले असून भाजप मुळे लोकशाहीला धोका असल्याचा सूर बैठकीतून एकत्रित रित्या उमटलेला दिसला १० किंवा १२ जुलै रोजी सर्व विरोधकांची शिमल्या मध्ये दुसरी बैठक होणार आहे या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली बैठकीमध्ये भाजपाच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यावर चर्चा करण्यात आली राज्यनिहाय बैठकी घेतल्या जाणार आहेत, वरिष्ठ नेते राज्याचे अनेक दौरे करणार असुन समान किमान कार्यक्रम तयार करावा अशी चर्चा करण्यात आली मतभेद बाजूला सारून भाजप विरोधात एकत्र येणे, विरोधी आघाडीवर समन्वयक नेमण्यावर भर देण्यात आला, याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, हेमंत सुरी, महिबुबा मुक्ती, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते उपस्थित होते. भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2024 आली सत्ते येण्याची स्वप्न पहात असताना विरोधकांची एकजूट भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.



