महाराष्ट्र

सोलापूरचे मकबुल मोहोळकर यांच्यासह सिद्धेश्वर आळंदकर,सलिम पामा,नजीब शेख,भारत साबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोन आणि एकात्मतेवर आधारित राष्ट्रवादीची वाटचालीवर आकर्षित होऊन सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी सभागृह नेते हाजी मकबूल मोहोळकर,माजी नगरसेवक सिद्धेश्वर आळंदकर,काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलिम पामा,काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख,न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष भारत साबळे,मकबुल मोहोळकर यांचे चिरंजीव ॲड. ताजुदीन मोहोळकर याच्यासह अनेक मान्यवरांनी आज मुंबई येथील महाराष्ट्र महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब याच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला…

याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब,क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे,आमदार शिवाजीराव गर्जे,आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी,प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी,जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष “युवा नेते” जुबेर बागवान,जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांची उपस्थिती होती…

या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व पक्ष प्रवेश केलेल्या मान्यवरांचे पक्षात मनपूर्वक स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या,सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या सोबत आपण पक्षकार्य करीत अजितदादाचे हात बळकट कराल तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याकरीता आपले योगदान महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा खा तटकरे साहेब यांनी व्यक्त केली…

या प्रसंगी पक्षाचे सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,शहर मध्य अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे,युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे,अल्ताफ बागवान,मुशिर आळंदकर,सिद्दिकी मुजावर,सलीम शेख,गौस नदाफ,रफिक मुल्ला,महबूब शेख,वसीम सय्यद,अबूबकर सय्यद,मुज्जू नदाफ,सोहेल शेख,गौस मालकु,अरबाज शेख,रब्बानी शेख,सोहेल शेख दुर्वेश,ऍड इस्माईल नालवार,विनोद जाधव,नाना गोवर्धन,सुरज कांबळे,नितीन ढवण आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button