महाराष्ट्र

नवरात्री निमित्त श्री देवीचा माळ येथील कमला भवानी मंदिरामध्ये सातव्या माळेनिमित्त घेतले हजारो भाविकांनी दर्शन

जेऊर प्रतिनिधी आलिम शेख

श्रीदेवीचामाळ येथील कमला भवानी मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले आज सातविमाळ होती दिवसभर भाविकांचे गर्दी होती यामध्ये लहान मुले व महिलांनी संख्या लक्षणीय होती आज सकाळी श्री कमला भवानीची महापूजा चंदन मळवट भरून व त्यावर हळदी कुंकवाचा लेप देऊन सुवर्ण मुकुटासह महापूजा मांडण्यात आली ही महापूजा ओंकार पुजारी यांनी मांडली

यावेळी सर्व पुजारी सोरटे मानकरी इत्यादी उपस्थित होते अन्नछत्रमार्फत दिवसभर फराळाच्या पदार्थाचे वाटप अविरतपणे चालू होते भाविकांनी त्याचाही लाभ घेतला आणि समाधान व्यक्त केले मंदिराचे मूळ स्वरूप देण्याचे काम चालू असून त्याला अवधी लागणार आहे तरीही मंदिर परिसर स्वच्छता याबाबत काळजी घेण्यात आली आहे ग्रामपंचायत मार्फत पाण्याची व स्वच्छतेची सोय करण्यात आलेली आहे यात्रेकरूंना सर्व सुविधा देण्यास मंदिर विश्वस्त व ग्रामपंचायत देवीचामाळ यांनी प्राधान्य दिले आहे त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

शुक्रवार रोजी अष्टमी असून रात्री 11:55 वाजता होम हवनला सुरुवात होणार आहे पहाटे पाच वाजता पूर्णाहूती होणार असून यासाठी तयारी पूर्ण झाली आहे शनिवारी महानवमी असून भवानी मातेला पुरणपोळीचा महानैवद्य अर्पण करण्यात येणार आहे या नंतर घटोत्थापन होवून उपवासाचे पारणे होणार आहे, अशी माहिती मानकरी भाऊसाहेब फुलारी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button