सफाळे मांडे येथे एका महिलेचा खून करून फरार झालेल्या 3 आरोपींपैकी 2 आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांना यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील माकणे येथील एका महिलेचा खून करून तिचे दागिने घेऊन फरार झालेल्या 3 आरोपींपैकी 2 आरोपींना जेरबंद करण्यात सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या पथकाला शनिवारी यश आले असून अन्य एक तिसरा आरोपी आकाश कांबळे यांचा सफाळे पोलीस कसून शोध घेत आहेत.
सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील माकणे नाईन स्टार लँडमार्क येथे राहणारी नेपाली महिला पदमा बहादूरसिंग बिक वय वर्ष (57) ही 6 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विटी-लाईन मेन रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी गेली असताना अज्ञात इसमानी तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून करून तिच्या अंगावरील दागिने लूटमार करून तिचा मृतदेह मांडे मुजबादेवी मंदिर येथील प्रसन्ना ठाकूर यांच्या शेतात बेवारसपणे टाकून देऊन हे आरोपी फरार झाले होते.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सफाळे या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची नियुक्ती केली असताना त्यांनी अवघ्या तीन महिन्यात तांत्रिक पुरावांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसताना देखील सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी राजेश बिजिरे सोनार वय वर्ष (21)राहणार सफाळे व करण मानसिंग वय वर्ष (30) राहणार सफाळे या दोन आरोपींना शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता या दोन आरोपींनी पैशासाठी पदमा बहादुरसिंग बिक या (57) वर्षीय महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. तसेच या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या त्यांचा तिसरा साथीदार आकाश कांबळे राहणार विरार याचा सफाळे पोलीस कसून शोध घेत आहेत
या दोन आरोपींना जेरबंद करून सफाळे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती नीता पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर, पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा पालघर, सफाले पोलीस ठाणे प्रभारी पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सावंत देसाई, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा पालघर व सफाळे पोलीस ठाणे अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे.



