महाराष्ट्र
शिवजयंती निमित्त पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्त पिंपरी बु. यांच्यावतीने सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आला आहे.
रविवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणुक व पुजन, सकाळी ठिक ११ वाजता शरद (बापू) बोडके यांचेकडून स्नेह भोजन ठेवण्यात आले आहे. तरी यामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. शालेय शिव-सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालय, पिंपरी बु. यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.



