महाराष्ट्र

गायरान जमिनीच्या सातबारांवर येणार अतिक्रमण करणाऱ्यांची नावे.एकही अतिक्रमण हटवले जाणार नाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वंचितच्या मोर्चाला आश्वासन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

राज्यभरातील गायरान जमिनीवर झालेले एक ही अतिक्रमण हटवले जाणार नाही असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला गुरुवारी दिले. गायरान जमिनीच्या सातबारावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांची नावे लावण्याची प्रक्रिया तहसीलदारांमार्फत राबवण्यात येणार असल्याची फडणवीस म्हणाले

राज्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना सरकारने नोटीस बजवले आहेत 358 तालुक्यातील 2 लाख 47 हजार अतिक्रमणधारकांना सरकारने नोटीस काढले आहेत भटके विमुक्त तसेच अनेक गोरगरीब नागरिकांना बेगर होण्याची भीती यातून निर्माण झाली. या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड मोर्चा गुरुवारी धडकला

मेट्रो सिनेमा पासून दुपारी 12 च्या दरम्यान निघालेला हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ सभेत रुपांतरीत झाला हा मोर्चा सुरू ठेवून अँड. प्रकाश आंबेडकर यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले गायरान जमिनीवरच्या अतिक्रमित जमिनीवरच्या पिकांचा सरकारी अधिकारी लिलाव करणार नाहीत या जमिनीवरची घरे पाडण्यात येणार नाहीत असे आश्वासन फडवणीस यांनी दिले.

वंचित आघाडीने रखडलेल्या एसआरए प्रकल्पाचाही प्रश्न मांडला मुंबईत रखडलेल्या एसआरए प्रकल्पामुळे नागरिकांची हाल होत आहेत अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे विकसित भाडे देत नसल्याने दाग दागिने विकून कर्ज काढून भाडे भरावे लागत आहे याकडे अँड.आंबेडकर यांनी लक्ष वेधले जेएसआरए चे प्रकल्प रखडले आहेत ज्या ठिकाणी बिल्डर रहिवाशांना घर भाडे देत नाहीत हे प्रकल्प म्हाडा मार्फत राबवण्याचा निर्णय सरकार घेईल असेही फडणवीस यांनी सांगितले या मोर्चामध्ये रेखा ठाकूर.अशोक सोनवणे. अंजली आंबेडकर.निलेश विश्वकर्मा वंचितच्या युवक महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
04:51