अकलूज अशोका चौक (जयसिंह चौक) ते कर्मवीर चौक रस्त्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार – महेश शिंदे

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांच्याकडून अधिकृत उत्तर प्राप्त झाले आहे.
अशोका चौक ते कर्मवीर चौक दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था व नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेता संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला अखेर यश मिळून सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार सदर रस्ता डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी समाविष्ट करण्यात आला असून उपलब्ध निधीनुसार टप्प्याटप्प्याने कामे करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे नागरिकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने झालेला ठोस पाठपुरावा हीच या यशामागची मुख्य ताकद ठरली आहे.



