सफाळे माकणे गावातील चोर झाला जागा.. खाकी वर्दी बघून तीन लाख रुपये चोरीची स्वतः दिली सफाळे पोलिसांना कबुली

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे माकणे पंडितपाडा गावातील बंटी दळवी यांच्या घरातील 3 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या याच गावातील आरोपीला अवघ्या सहा तासात सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या पोलीस टीम पथकाने जेर बंद करून त्यांच्या ताब्यातील तीन लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील माकणे पंडितपाडा गावात गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी अज्ञात चोरांनी बंटी दळवी यांच्या घरातील कपाटात ठेवलेले तीन लाख रुपये रोख रक्कम चोरी केल्याची पोलीस तक्रार माकणे पंडितपाडा गावातील बंटी दळवी यांच्या पत्नीने सफाळे पोलीस ठाण्यात दिल्यावर त्वरित घटनास्थळी सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, पोलीस उपनिरीक्षक कैलास खाडे आपली पोलीस टीम घेऊन दाखल झाले आणि तपासाची चक्रे फिरवली व आपल्या पोलीस वर्दीचा आणि कायद्याचा दाख दाखवून आजूबाजूच्या परिसरात सखोल चौकशी करून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला होणारी शिक्षा याचे महत्त्व पटवून दिल्यावर घटनास्थळी उपस्थित असलेल्या याच गावातील एका इसमाने 3 लाख रुपये चोरी केल्याची कबुली दिल्यावर सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी या आरोपीला अटक करून त्याच्याकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.



