शिवराणा गणेश उत्सव मंडळाने आयोजित केले भव्य आरोग्य निदान शिबीर…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज मसूदमळा महाळुंग रोड येथील शिवराणा गणेश उत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी सामाजिक उपक्रम राबवले असून मंडळाने भव्य असे आरोग्य निदान शिबिर आयोजित केले
2017 साली शिवराणा गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती,मंडळाने स्थापने पासूनच सामाजिक चळवळीचे देखावे सादर केली आहेत,गेली सात आठ वर्षे मंडळाने अनेक उपक्रम हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले आहेत…

यंदाच्या वर्षी मंडळाने आरोग्य निदान शिबिर आयोजित केल्या नंतर सदरच्या मंडळाचे लहान लहान कार्यकर्त्यांनी अक्षरशःहा गल्लोगल्ली जाऊन आरोग्य निदान शिबिराची महत्व पटवून दिले,त्या चिमुकल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे आरोग्य निदान शिबिर यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया समता नगर, रणजीत नगर तसेच महाळुंगरू रोड परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली…

कालच दिनांक 02/09/2025 मंगळवार रोजी अकलूज चे युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी या शिवराणा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन आपल्या लाडक्या बाप्पाची आरती केली आणि या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक ही केलं

सदरच्या आरोग्य निदान शिबिरास शिवराणा गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष :- संतोष मच्छिंद्र पवार,उपाध्यक्ष :- रोहन मयुर सावंत,खजिनदार :- प्रथमेश रुपेश पवार,सचिव :- सागर लक्ष्मण सावंत,कार्याध्यक्ष :- स्वराज ढेरे पाटील,सदस्य :- मच्छिंद्र पवार,उमेश पवार,रुपेश पवार,विजय पवार,कुणाल साळुंखे,प्रणव साळुंखे,सुखदेव चव्हान,रामभाऊ पवार,यश पवार,स्वराज ढेरे पाटील,आर्यन चव्हान,शिवदक्ष चव्हान,आर्यन सावंत यांनी विशेष परिश्रम घेऊन हे शिबिर यशस्वी करून दाखवले…



