शहर

वरीष्ट डाॕक्टरांचा आदर्श घेवुन इतर डॉक्टरांनी कामकाज केले पाहिजे – मदनसिंह मोहिते-पाटीलराऊत हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अकलूज शहराचे वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवुन देवुन मेडीकल हब बनविण्यासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा आदर्श घेवुन नुतन डॉक्टरांनी सुद्धा वैद्यकीय सेवेत कामकाज केले पाहिजे ” असे मत सोलापूर जिल्हा परीषदेचे .अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

माळेवाडी- अकलूज शहरामध्ये नव्याने सुरु झालेल्या डॉ.आश्विनी व डॉ.दिग्विजय राऊत यांच्या अत्याधुनिकश सुविधा ने सुसज्ज असलेल्या ” राऊत हाॕस्पिटल ” चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मोहिते-पाटील हे बोलत होते, ते पुढे म्हणाले कि ” पुर्वी रुग्णांना उपचारासाठी पुणे,सोलापूर सारख्या मोठ्या शहरात जावे लागत होते. त्यामुवे पैसा आणि वेळ हि जास्त वाया जात होता.

वेळेत उपचार न झाल्याने काही रुग्ण हाती लागत नव्हते..परंतु अकलूज शहरामध्ये नामवंत असलेले डॉ.एम,के. इनामदार ,डॉ.राजीव राणे , व डॉ.सतीश दोशी या देवाच्या रुपात असलेल्या त्रिदेव डॉक्टरांनी अकलूज शहरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देवुन ” रुग्णसेवा हीच इश्वर सेवा समजुन ” गेल्या तीस- चाळीस वर्षापासून रुग्णसेवा करुन लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या या देवासमान असणाऱ्या डॉक्टरांचा आदर्श नव्या पीढीने घेवुन वाटचाल केली पाहिजे.
तसेच शहरातील सगळेच डाॕक्टर्स रुग्णांना चांगली सेवा देत असल्याने समाधान मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माळीनगर साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन राजेन्द्रभाऊ गिरमे,सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.एम.के.इनामदार , बालरोगतज्ञ डॉ.राजीव राणेसर, स्त्रीरोगतज्ञ डॉ.सतीश दोशी , डॉ.तानाजी कदम. मेडीकल असोसिएन्स चे अध्यक्ष डॉ.नितीन एकतपुरे, डॉ.धनेश गांधी. डॉ.शैलेश गायकवाड , डॉ. श्रधा जवजांळ, एसएमपी बॕकेचे संचालक गजानन एकतपुरे, डॉ.राजेश एकतपुरे, एम.के. एन्टरप्रायजेस ॲन्ड डेव्हलपर्सचे मॕनेजिंग डायरेक्टर मुबारक कोरबू , डॉ.संजय इंगळे , सरपंच जालिंदर फुले, भारत फुले, प्रकाश एकतपुरे यांचे सह अकलूज पंचक्रोषीतील नामवंत डॉक्टर्स, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थीत होते.प्रारंभी सर्वांचे स्वागत डॉ.दिग्विजय राऊत यांनी मानले. श्रीधर एकतपुरे ,आस्लमभई कोरबू. अमोल एकतपुरे , संदेश राऊत, डॉ. नबीशा सय्यद,डॉ. शकंरराव शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विशेष प्रयत्न केले.. शेवटी सर्वांचे आभार स्त्रीरोगतज्ञ डॉ.आश्विनी राऊत यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button