महाराष्ट्र

पैगंबर जयंती आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिर…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव आणि 05/09/2025 रोजी सबंध जगामध्ये साजरी होणाऱ्या “पैगंबर जयंती” निमित्त माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक कार्यकर्त्यांनी अकलूज येथे भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली…

अकलूज येथील ग्रामीण रुग्णालयाच्या समोर बुधवार दिनांक 03/09/2025 रोजी सकाळी 10 वाजले पासून संध्या 05 वाजे पर्यंत भव्य असे रक्तदान शिबीर पार पडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले…

भव्य अशा रक्तदान शिबिरास माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील भेट देणार आहेत…

या रक्तदान शिबिराचे आयोजक सुरेश भाऊ गंभीरे,तनवीर तांबोळी,जब्बार तांबोळी,ओंकार मोरे,सुधीर मोरे, फारुक शेख,हरीश भोसले,विजय पाटील,फिरोज तांबोळी,आमीर बागवान,पप्पू शेख,अकिल बागवान,आसिफ कुरेशी,बाळू पवारआणि इतर सहकारी..

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे🩸🩸

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button