क्राईम

पालघर जिल्ह्यातील वाणगाव पोलीस ठाणे हद्दीत सापडला बेवारस अर्भकाचा मृतदेह

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका आश्रम शाळेजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका नवजात बेवारस अर्भकचा मृतदेह पोलिसांच्या हाती सापडला आहे.
ही घटना बुधवार दिनांक 03 डिसेंबर 25 रोजी वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील साखरे गावाजवळ असलेल्या छेदिसिंह ठाकुर आश्रम शाळेजवळ घडली आहे.

पहाटेच्या वेळी आश्रम शाळेजवळील रस्त्याजवळ कचऱ्याच्या ढिगार्‍यात या नवजात अर्भकाचा मृतदेह ग्रामस्थांना दिसून आल्यावर याबाबत ग्रामस्थांनी वाणगाव पोलिसांना प्रथम माहिती दिल्यावर वाणगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून हा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व शवविच्छतेने साठी स्थानिक रुग्णालयात पाठवलाआहे.

याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वाणगाव पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button