महाराष्ट्र

अकलूज पोलीस स्टेशनच्या आवारात १५१ बेवारस वाहने; मालकांनी १५ दिवसांत कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network

​अकलूज : अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध कारवायांदरम्यान जप्त केलेली आणि बेवारस स्थितीत मिळून आलेली सुमारे १५१ वाहने सध्या पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली आहेत. या वाहनांच्या मालकी हक्काबाबत अद्याप कोणीही समोर आलेले नसून, संबंधितांनी १५ दिवसांच्या आत आपली कागदपत्रे घेऊन वाहनावर दावा करावा, असे आवाहन अकलूज पोलिसांनी केले आहे.

​सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, अकलूज पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​एकूण वाहने: १५१ (दुचाकी व इतर).

​अकलूज पोलीस स्टेशनचा नोटीस बोर्ड, अकलूज बस स्थानक, माळशिरस, वेळापूर आणि नातेपुते पोलीस स्टेशन या ठिकाणी वाहनांच्या नंबरसह सविस्तर यादी लावण्यात आली आहे.

​मालकांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले मालकी हक्काचे पुरावे (RC बुक, विमा, ओळखपत्र) घेऊन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

​यादीत तुमच्या गाडीचा नंबर आहे का? एकदा नक्की तपासा.

​जर आपली गाडी चोरीला गेली असेल किंवा बेवारस स्थितीत सापडली असेल, तर नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

१) अकलूज पोलीस स्टेशन: ०२१८५-२२२१००

२) पोहेकॉ/९१ तानाजी टिंगरे: ७०२०१०५४२७, ८८०५८९९०९१

३) पोकॉ/४५२ मोहन मस्के : ९६८९८५८४२७

​मुदतीत कोणीही हजर न झाल्यास, सदर वाहने बेवारस समजून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांची लिलावात विल्हेवाट लावली जाईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button