उंबरे जिल्हा परिषद शाळेस साऊंड सिस्टिम भेट

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
उंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन समाधान शिवाजी चव्हाण यांच्याकडून साऊंड सिस्टिम सेट भेट देण्यात आला…
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन समाधान शिवाजी चव्हाण यांचेकडून शाळेस दहा हजार रुपयांची साऊंड सिस्टिम सेट भेट देण्यात आला.त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामपंचायत व शाळा यांच्याकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला…
गावातील विविध स्थानाबद्दल त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव होत आहे.तसेच त्यांच्या या सामाजिक कार्याचा इतर लोकांनीही आदर्श घ्यावा असे त्यांनी आव्हान केले आहे…
शाळा हे एक पवित्र मंदिर असून तेथे शिकणारे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचा भविष्यकाळ आहे.त्यासाठी शाळा या नंदनवन होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले…
यावेळी अकलूज बाजार समितेचे संचालक पोपटबापू भोसले,कारखान्याचे संचालक विनायक केचे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल केचे,विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन गणेश पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,उंबरे वे च्या सरपंच सौ सुवर्णताई भोसले,ग्रामसेविका सौ.शिंदे मॅडम,गावच्या पोलीस पाटील सौ.गीतांजली पाटील,अंकुश केचे माजी चेअरमन,तानाजी जाधव,हरिदास गायकवाड,हरिदास भोसले,सिद्धेश्वर भोसले माजी चेअरमन,शंकर भोसले,भीमराव पाटील,बाळासाहेब भोसले,संजय चौगुले,विनायक गुरव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते…



