भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महेश शिंदे यांची नगर परिषदेकडे तक्रार – सुजित गार्डन रस्त्यावर तात्पुरता मुरूम टाकण्याची मागणी

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज : शहरातील सुजित गार्डन मागील रस्त्यावर नगरपरिषदेच्या वतीने पाइपलाईन व ड्रेनेजचे काम करण्यात आले होते. मात्र, सदर कामानंतर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून नागरिकांना व वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गाड्या बाहेर काढणे कठीण झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महेश शिंदे यांनी नगर परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीत, “तात्पुरत्या स्वरूपात तरी रस्त्यावर दगडी मुरूम टाकून तो चालण्यायोग्य व वाहन चालण्यायोग्य करावा, तसेच कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे”, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना अडथळा निर्माण होऊ नये व अपघाताचे प्रमाण वाढू नये म्हणून नगर परिषदेकडून तातडीने सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे



