महाराष्ट्र

खा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्ठ मंडळाने घेतली गृह मंत्री अमित शाह यांची भेट…

🎯 सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्याची मागणी खा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठ मंडळाने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली…

गेली दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती,पिके आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.तसेच शहरी भागातही या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील,खासदार बजरंग सोनावणे,खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी भेट घेतली…

या भेटीदरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केंद्र शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस बांधवांवर गुंड प्रवृत्तींकडून होणाऱ्या वारंवारच्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त करत,या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणीही या शिष्टमंडळाने केली…

यावेळेस खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सहकार क्षेत्रात दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी सहकार मंत्रालयामार्फत विशेष केंद्रीय पुरस्कार सुरू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button