डहाणू धानिवरी गावाजवळ साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाड्यांच्या टेम्पोचा अपघात… 13 जणांचा मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धानिवरी गावाजवळ सोमवारी संध्याकाळी 4.00 वाजता झालेल्या भीषण रस्ता अपघाताबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणारे अंदाजे 30 ते 40 प्रवासी घेऊन जाणारा आयशर टेम्पो क्रमांक MH 48 DC 7474 मुंबई-गुजरात मार्गावर चुकीच्या दिशेने जात होता. गावाजवळ पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या NL 01 AC 9118 हा क्रमांक असलेल्या ट्रेलरचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. तसेच या अपघातात MH 04 EM 8425 या क्रमांकाची मोटरसायकल देखील चिरडली आहे.या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रशासनाने पुष्टी केली आहे. बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य सुरू केले आहे . तर 14 जखमींना तातडीच्या उपचारांसाठी डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशी माहिती पालघर जिल्हा प्रशासना तर्फे देण्यात आली आहे.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत 1) सुरेश रत्ना लाखत, 2) पांडू गणपत लाखत, 3) काळू गोविंद लाखत, 4 )सुनील अर्जुन दांडेकर, 5 ) चिमा गोविंद कुरहाडा, 6 ) नमिता विठ्ठल दांडेकर, 7 ) सारिका संतोष लाखत, 8 ) आयुष सिताराम लाखत, 9 ) सागर नामदेव शेंडे, 10 ) वंदना शिवराम वळवी, 11 ) सलोनी शिवराम वळवी, 12 ) अजय अहाडी, 13 ) रियांक्षी संतोष लाखत घटनास्थळी पालघर जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणा उपस्थित राहून मदतकार्य तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय साधत आहेत.या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



