सत्ता…सत्त्ता आणि सत्ता कवियात्री नूरजहाँ फकृद्दीन शेख

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
विसरले सारे नीतिमत्ता
हवीय सत्ता ..सत्ता..सत्ता
खोके,ओके,सारेच बोके
टपले सत्तारुपी लोण्यावर
आमदार खासदार नेते मंत्री
पक्ष,अपक्ष,विपक्ष साऱ्यांनीच
केलाय मिसळ भेळभत्ता
विसरले सारे नीतिमत्ता
लगीन केलंय एकाशी
नांदायचं दुसऱ्यापाशी
राजकारणाची ऐशी तैशी
एकी कोणाशी बेकी कोणाशी
आरोप नी पुरावे बंद मुठीत आत्ता
काडीमोड घेताच वैध होई अवैध मालमत्ता
विसरले सारे नीतिमत्ता
पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते भांडतायत
ह्यांचे नेते एकच ताटात जेवतायत
आल्टी पलटी कल्टी मारून
घेतायत झोळ्या आपल्या भरून
खेळ हा जनता पाहे गपगुमान
विचार प्रवाहांचा झालाय सारा गुंता
विसरले सारे नीतिमत्ता
कामधंदा सोडून यांच्या मागे पळता
ऐकून यांचे बंधूभाव हि विसरता
कार्यकर्त्यांनो सावध व्हा रे आत्ता
शहाणे व्हा रे नका दाखऊ जतियता
टिकवा आणी दाखवा आपली एकता
ही सत्ता सत्ता सत्ता
विसरायला लावते नीतिमत्ता

नूरजहाँ फकृद्दीन शेख
(कवियात्री)
गणेशगाव
ता.माळशिरस जि.सोलापूर



