अमली पदार्थ विरोधी पालघर जिल्हा संघर्ष समिती तर्फे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचा सन्मान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत
अमली पदार्थ विरोधी पालघर जिल्हा संघर्ष समिती तर्फे पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांना विशेष ‘आभार पत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात अमली पदार्थ व केमिकल माफिया यांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या धडाडीच्या नियोजित आणि प्रभावी कारवाईमुळे समाजामध्ये सुरक्षिततेची भावना विश्वास आणि निर्धार निर्माण झाल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
या समितीच्या वतीने सांगण्यात आले की पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने केलेल्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे जिल्ह्यातील तरुण पिढीला व्यसनमुक्त, निरोगी आणि उज्ज्वल भवितव्याची दिशा मिळत आहे. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे अनेक अवैध अमली पदार्थ विक्रेत्यांच्या आणि केमिकल माफियांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून भविष्यात अशा बेकायदेशीर टोळ्यांचा प्रभाव संपूर्णपणे नष्ट होईल असा विश्वास समितीने व्यक्त केला.
या उपक्रमांमुळे पालघर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलिस प्रशासनाविषयी आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. जिल्हा सुरक्षित आरोग्यदायी आणि तरुण पिढी व्यसनमुक्त राहण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे समितीने मनःपूर्वक कौतुक केले असून अमली पदार्थ विरोधी पालघर जिल्हा संघर्ष समितीने जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या कार्यतत्परतेचे दूरदृष्टीचे आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
तसेच भविष्यातील मोहिमांसाठी पूर्ण सहकार्य आणि पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे .समितीचा ठाम विश्वास आहे की पोलिस प्रशासन,जागरूक पत्रकार व जनतेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पालघर जिल्हा लवकरच अमली पदार्थ व केमिकल माफियामुक्त होईल आणि एक आदर्श, सुरक्षित व निरोगी जिल्हा म्हणून राज्यात ओळख निर्माण करेल.यावेळी समिति चे वरिष्ठ पदाधिकारी प्रभाकर राऊल,समीर मोरे, दीपेश पावड़े (ओबीसी नेते)तसेच सुषमा भोसले, प्रिंसिपल, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय, बोईसर आदि उपस्थित होते.



