शहर

सफाळे डोंगरे गावातील विलास किणी यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करताना बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यात 19 जुलै 2023 रोजी मुसळधार पाऊस पडल्यामुळे सफाळे एडवण मार्गावरील सावरपाडा येथे भले मोठे झाड पडले होते. याच रस्त्यावरून जाताना सफाळे डोंगरे गावातील (44) वर्षीय विलास रघुनाथ किणी आणि त्यांची मुलगी दुचाकी वर बसून जात असताना त्यांचा या झाडावर आदळून अपघात झाला होता.या अपघातात विलास किणी यांना जबरी दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

ता तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली होती.
विलास किणी यांचा अपघाती नैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून बोईसर मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील आणि सफाळे येथील पिटी सर आणि कल्पेश शशिकांत भोईर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून अखेर विलास किणी यांच्या कुटुंबीयांना मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी 4 लाख रुपयांचा सरकारी धनादेश सुपूर्द केला यावेळी बहुजन विकास आघाडीचे बोईसर मतदार संघाचे आमदार राजेश पाटील,पिटी सर, डोंगरे गावचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कल्पेश शशिकांत भोईर, पोलीस पाटील वैभव शिवराम घरत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button