माळशिरस (सोलापूर) पिरळे येथील संदीप रघुनाथ वाघ यांच्या स्थावर मालमत्तेचा तिसऱ्यांदा जाहीर लिलाव 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणार!

टाईम्स 9 मराठी प्रतिनिधी: महेश मोहिते (मो. 8380848373)
सोलापूर: माळशिरस तालुक्यातील पिरळे येथील रहिवासी संदीप रघुनाथ वाघ आणि रघुनाथ केरू वाघ यांच्या स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव माळशिरस तहसील कार्यालयामार्फत तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
📌 पूर्वीचा लिलाव झाला होता रद्द
माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने यापूर्वी दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सदर स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव काढण्यात आला होता. यासाठी लिलावाचे पत्रक टाइम्स 9 मराठी वाहिनीकडे प्रसिद्धीसाठी सादर करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे तहसील कार्यालयाने त्या दिवशीचा लिलाव रद्द केला होता आणि पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल असे जाहीर केले होते.
🔔 25 नोव्हेंबर रोजी तिसरा प्रयत्न
रद्द झालेल्या लिलावानंतर, आता संदीप रघुनाथ वाघ आणि रघुनाथ केरू वाघ यांच्या स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव 25/11/2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
माळशिरस तहसील कार्यालयाने तालुक्यातील जास्तीत जास्त जनतेने या जाहीर लिलावात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
टीप: या लिलावा संदर्भातील नियम आणि अटी तसेच संपूर्ण प्रक्रिया लवकरच एका स्वतंत्र बातमीद्वारे प्रसारित केली जाईल.



