महाराष्ट्र

म्हसोबावाडी दुर्घटनेतील चारही मृतदेह शोधण्यात प्रशासनाला आले यश..

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

इंदापूर मधून मोठी अपडेट आहे म्हसोबावाडी येथे मातीच्या ढिगा याखाली विहिरीत गाडले गेलेल्या चार मजूरांपैकी शेवटचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता त्यानंतर दीड तासाने दुसऱ्या दोन मजुरांचा मृतदेह सापडला त्यानंतर तासाभराच्या अंतराने शेवटच्या मजूराचा मृतदेह सापडला आहे.सर्वच्या सर्व मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.सोमनाथ गायकवाड जावेद मुलाणी परशुराम चव्हाण आणि मनोज उर्फ लक्ष्मण सावंत अशी मृतांची नांवे आहेत.

मंगळवारी दुपारी इंदापूर तालुक्‍यातील म्हसोबावाडी येथे एका खाणीत विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर आल्याने चार जण विहिरीत अडकले होते हे सर्व कामगार इंदापूर तालुक्‍यातील बेलवाडी गावचे आहेत. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून या ठिकाणी त्यांचा शोध सुरु होता. आज चौथ्या दिवशी दुपारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

म्हसोबावाडीतील विहिरीचं काम सुरु असताना चार कामगार गाडले गेले.. या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आज यश आलं आहे.एनडीआरएफच्या २७ जवानांच्या पथकानं ही यशस्वी कामगिरी केलीय अनेक अडचणी असताना या पथकानं या मृतदेहांचा शोध घेतला. प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळं शोध घेण्यात मअडचणी होत्या.परंतु विविध पद्धतीनं शोध घेतल्यानंतर या चौघांचेही मृतदेह मिळाल्याचं या पथकाचे प्रमुख प्रमोदकुमार सिंग यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button