तेलंगणात कर्जमाफी केल्यामुळे माळशिरस तालुक्यातील उंबरे( द.) येथे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांची 19 हजार कोटीची कर्जमाफी केली आहे.त्याचा माळशिरस तालुका भारत राष्ट्र समितीचे समन्वयक सचिन वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मारुती शंकर ठोंबरे,बाबुराव ठोंबरे सोमनाथ पाटील,पोपट वाघमोडे,बाबुराव नारनवर, समाधान वाघमोडे,रणजीत वाघमोडे,किरण वाघमोडे,तुषार ढेकळे,दादा मोठे,अर्जुन ढेकळे,डॉक्टर गणेश वाघमोडे,पालवे व माने साहेब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सचिन वाघमोडे म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज,पाणीपट्टी बिल माफ आहे,पेरणीसाठी दहा हजार एकरी,दलित बंधू योजनेतून दहा लाख रुपये अनुदान,धनगर समाज व ओबीसी समाज यांना प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान,वयस्कर व्यक्तींना पेन्शन योजना,विकलांग योजना तसेच आतापर्यंत तीन लाख घरे मंजूर झाले आहेत. कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक असे लग्नासाठी 100116 रुपये मोफत देण्यात येत आहेत. मेंढी पालन करणारे शेतकऱ्यांना मोफत मेंढी वितरण करण्यात येत आहे. 24तास मोफत वीज पुरवठा,अक्षय ऊर्जा,सिंचन योजना,मत्स्यपालन,शेतकरी मंच अशा अनेक योजना तेलंगणा सरकार राबवत आहे.आत्ता राज्यातील शेतकऱ्यांचे 19 हजार कोटी रुपये संपूर्ण कर्ज माफ केले आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लवकरच संपूर्ण कर्जमाफी करावी व लवकरच आम्ही माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यात बी आर एस पक्षाने तेलंगणात केलेल्या कामाला घेवुन जाऊ असेही सचिन वाघमोडे यांनी सांगितले.
विजय ठोंबरे यांनी अशा योजना महाराष्ट्र राज्यात राबवायच्या असतील तर आता महाराष्ट्र राज्याला बी आर एस सरकार शिवाय पर्याय नाही,असेही सांगितले.