शहर
पालघर जिल्ह्यातील केळवा रोड बीचवर स्वच्छता अभियान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे व केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ पर्यावरण संवर्धन मंडळ आणि संत निरंकारी मंडळ ब्रांच पालघर आणि लायन्स क्लब तसेच ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त विद्यमानाने
1 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यातील केळवे बीच सुरुबाग भुईकोट किल्ला ते केळवा बीचमुख्य द्वार येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले

या अभियानामध्ये केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी सह पोलीस कर्मचारी,आणि ग्रामपंचायत केळवे सरपंच संदीप किणी आणि सदस्य तसेच संत निरंकारी मंडळ सेवा दल यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन हे अभियान राबवले.




