महाराष्ट्र

माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या वीट येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या जाहीर सभेचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

माढा लोकसभेचे महा विकास आघाडीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या वीट येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलताना दिली

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले की लोकसभेचे महाविकास आघाडीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तरुण युवा उमेदवार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा उद्या दिनांक 2 मे 2024 रोजी वीट येथील ग्रामपंचायत कार्यालय समोर सायंकाळी पाच ते आठ या वेळेत आयोजित करण्यात आली असून सदर सभेला वीट परिसरातील मतदारांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री पाटील यांनी बोलताना केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button