वाढीव पाणीपट्टीचे दर तात्काळ कमी करून चालु दराने वसुली करा अन्यथा तिव्र आंदोलन करू – शाहूराव फरतडे

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
शेतीच्या पिकासांठी लागणाऱ्या पाण्यासाठीच्या
पाणीपट्टीत सरकारने दहापटीने वाढ केली असुन सदरची दरवाढ तात्काळ रद्द करून चालू दराप्रमाणे आकारणी करून वसुली करा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांनी जलसंपदा विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

शिवसेनेकडून दिलेल्या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार काम करत आहे अशा वल्गना करणाऱ्या सरकारने शेतीपिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी दहपटीने वाढवल्याने उजनी,सिना कोळगाव, मांगी सह इतर मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
२०१८\१९ ला बारमाही पिकांसाठी पाणीट्टीचा दर हा स्थानिक करांसह एका एकरास वार्षिक ५३८ रू होता.मात्र नवीन दरवाढी नुसार बागायती शेतीसाठी एका एकरासाठी वर्षाला ५ हजार ४३३ रू मोजावे लागणार आहेत. खरिपासाठी, एकरी १हजार ८९० ,रब्बीसाठी ३ हजार ७८० रू पाणीपट्टी भरावी लागणार आहे .त्यामुळे,उजनी वरील दहिगाव, मांगी,सिना कोळगाव, यासह मध्यम प्रकल्पांवरूण पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना दहापट अधिकची पाणीपट्टी भरावी लागणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे त्यामुळे पाणीपट्टी कर वाढीचा निर्णय तात्काळ रद्द करून चालू करानुसार वसुली करावी अन्यथा शेतकरी एक रुपया देखील भरणार नाहीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहुण या निर्णया विरूद्ध तिव्र आंदोलन करू अशा इशारा फरतडे यांनी दिला.

यावेळी सुनिल बंडगर, रेवाप्पा ननवरे, शहाजी धेंडे, संजय भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.निवेदनाची प्रती जलसंपदा मंत्री, कृषी मंत्री ,विरोधीपक्ष नेते ,जिल्हाधीकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.



