महाराष्ट्र
नातेपुते पोलीस स्टेशनचे Api महारुद्र परजणे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल व पीएसआय विक्रांत दिघे यांची मुंबई येथे Api पदी निवड झाल्याबद्दल भूमीहिन शेतकरी कामगार संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ

टाईम्स 9 मराठी प्रतिनिधी :महेश मोहिते मो.9307125598
नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परजणे यांच्या कामाची पोच पावती राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला व पीएसआय विक्रांत दिघे नातेपुते पोलीस स्टेशन या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी व नातेपुते येथील सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असल्यामुळे त्यांची नातेपुते हद्दीत सर्व नागरिकाकडून कौतुक केले जाते व कार्यामुळे सर्व नागरिकात आनंदी वातावरण आहे

तसेच पीएसआय पदी असलेली विक्रांत दिघे साहेब यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना एपीआय पदी पदोन्नती करण्यात आले तसेच भूमीहिन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली यावेळी उपस्थित नातेपुते येतील भैया लांडगे युवा मंच व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .




