शिवतेजसिंह मोहितेपाटील यांना महाळुंग च्या सागर यादव मित्रपरिवार यांनी घातला दोन हजार किलो फुलांचा हार

श्रीपूर
बी टी शिवशरणं
उद्योगपती व माळशिरस च्या पुर्व भागावर विशेष प्रेम सहकार्याची औदर्याची पाखर घालणारे कै उदयसिंह मोहितेपाटील यांचे चिरंजीव शिवतेजसिंह मोहितेपाटील यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडक्यात जल्लोष्यात साजरा करण्यात आला आजच्या वाढदिवसाचे खास आकर्षण व नावीन्य असे कीं महाळुंग श्रीपूर येथील सागरदादा यादव मित्र परिवार यांनी दोन हजार किलो वजनाचा हार क्रेन ने आणून शिवतेजसिंह यांना घातला
यावेळी हलग्यांचा कडकडात फटाक्यांची मोठी अतिशबाजी करण्यात आला एवढा मोठा देखणा सोहळा असलेला वाढदिवस साजरा करुन मोहितेपाटील परिवार यांच्या प्रती आदर आपुलकी दाखवली या सत्काराची आज माळशिरस तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे या सत्कार सोहळ्याला सागरदादा यादव बजरंग भोसले विपीन रणे बबलू भगत रमेश देवकर नितीन जाधव राजू शिंदे अक्षय जाधव रोहित मुंडफने विनोद मगर नागनाथ भोसले सुधीर भोसले अनिल सरवदे यांच्या सह सुमारे दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते
विशेष म्हणजे दोन हजार किलो वजनाचा हार व केक यांचा थरावर थर होते अश्या प्रकारे अगळ्या वेगळ्या पद्धतीने इतके नावीन्य प्रकारे वाढदिवस होत असल्याचे पाहून स्वतः शिवतेजसिंह त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच मातोश्री स्वयंप्रभादेवी मोहितेपाटील या भारावून गेल्या होत्या हा वाढदिवस सोहळा कौतुकाचा चर्चेचा विषय महाळुंग श्रीपूर च्या कार्यकर्त्यांनी घडवून आणला



