शहर

पालघर जिल्ह्यातील केळवा बीच परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

झाडे लावा पर्यावरण वाचवा झाडे आपली मित्र आहेत ती आपल्याला फुले आणि थंड हवा देतात झाडे नसतील तर आपले जीवन जगणे कठीण होईल म्हणून आपण सर्वांनी मिळून झाडे लावावी आणि त्यांचे संगोपन करावे असा भविष्यासाठी अनमोल संदेश देत केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी आणि केळवे ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच संदीप किणी यांच्या हस्ते केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील केळवा बीच सरूबाग भुईकोट किल्ला परिसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला.

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे व केळवा पर्यावरण संवर्धन समिती आणि लायन्स क्लब ऑफ केळवा यांच्या संयुक्त विद्यमानाने केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील केळवा बीच परिसरात रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी नारळ लागवड कार्यक्रमांतर्गत नारळाची एकूण 200 रोपे, कार्बन मोनोस ( धूप प्रतिबंधक झाडे) 100 रोपे, करंज जातीचे जंगली वृक्ष-200 रोपे असे एकूण 500 वृक्षांची लागवड करण्यात आली

यावेळी केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप सांबरे ग्रामपंचायत केळवे सरपंच संदीप किणी, केळवे पर्यावरण संवर्धन मंडल अध्यक्ष जयेश पाटील, लायन्स क्लब ऑफ केळवे अध्यक्ष कृषील वर्तक, माजी लायन अध्यक्ष केळवे हर्षल राऊत , केळवे उपसरपंच राजेश शालकर, संत निरंकारी मंडळाचे महात्मा रामदास तांडेल व त्यांचे सहकारी तसेच सुमिटोमो केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बोईसर सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, ॲडव्होकेट नचिकेत तरडे,अशोक राऊत,, मिलिंद चौधरी, दिलीप राऊत, हरिहर पाटील, रोहित राऊत आणि विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button