डॉ. शशिकांत कुलकर्णी “अतुल्य भारत राष्ट्रीय पुरस्कार 2025 “नि सन्मानित

टाईम्स 9 मराठी प्रतिनिधी:महेश मोहिते मो.9307125598
28 जून रोजी ज्ञान उदय फाउंडेशन व रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड द्वारा आयोजित बाविसाव्या अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलन 2025 चे औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी डॉ. शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी यांना शैक्षणिक व सामाजिक कार्य व उत्कृष्ट योगदानाकरिता मिळाले मुख्य अतिथी भारताचे राष्ट्रपती पदक विजेते पंडित ब्रिज नारायणजी ,श्रीमान सुरेंद्र कुमार ,आचार्य श्री प्रणव कुमार शास्त्री आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य ,श्री भगवानराव पाटील यांच्या उपस्थितीत व सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे ची यांच्या हस्ते “अतुल्य भारत राष्ट्रीय पुरस्कार 2025″सन्मानचिन्ह व फ्रेम प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. शशिकांत कुलकर्णी हे गेल्या 36 वर्षापासून शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूलमध्ये काम करतात त्या सध्या समन्वयक म्हणून काम करतात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसेच तज्ञ शिक्षक म्हणून काम केले आहे .हिंदी प्रचार प्रसार ,दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ,वृक्षारोपण व संवर्धन ,वन्यजीव जागृती ,पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती, सोलापूर हिंदी जिल्हा शिक्षक आदर्श पुरस्कार, रोटरी क्लब आदर्श पुरस्कार, त्यांना” अतुल्य भारत राष्ट्रीय पुरस्कार 2025″मिळाल्याबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय खासदार श्रीधैर्यशिल राजसिंहमोहिते पाटील ,संस्थेच्या अध्यक्ष शितलदेवी धैर्यशिलमोहिते पाटील, प्राचार्य अल्बर्ट थरकन, प्राचार्य बीनो पाउलस यांनी त्यांचे अभिनंदन केले व समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.



