सौ.काशीबाई सूर्यकांत फडतरे यांचे अल्पशा आजाराने निधन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पिटकेश्वर दिनांक 30/06/2025 : अभंग वस्ती,पिटकेश्वर-इंदापुर येथील रहिवासी सौ.काशीबाई सूर्यकांत फडतरे (वय 65 वर्षे) यांचे आज सोमवार दि.30 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास राहते घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

कै.सौ.काशीबाई सूर्यकांत फडतरे या अत्यंत धार्मिक स्वभावाच्या आणि मनमिळाऊ वृत्तीच्या होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने अभंग वस्ती पिटकेश्वर व सराफवाडी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आज सायंकाळी 4:00 वाजण्याच्या सुमारास अभंग वस्ती येथील शेतात त्यांचे पार्थिवावर अंतिम दाह संस्कार करण्यात आले. तिसऱ्याचा विधी बुधवार दिनांक 2/07/2025 रोजी सकाळी सात वाजता अभंगवस्ती, पिटकेश्वर येथे होणार आहे.
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क समुहाच्या वतीने त्यांनाभावपुर्ण श्रद्धांजली..😔💐🙏ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो..😔💐💐



