केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विराथन बुद्रुक ही एकमेव बियर वाईन दारू शॉप मुक्त असलेली ग्रामपंचायत

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील 477 ग्रामपंचायती पैकी विराथन बुद्रुक ही केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील एकमेव बिअर वाईन शॉप व दारू मुक्त असलेली लाडकी ग्रामपंचायत आहे.
ही ग्रामपंचायत केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या पोलीस ठाणे हद्दीतील आहे.
सध्या या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ अंजली किणी आहेत.
या ग्रामपंचायतीची आताची लोकसंख्या सहा हजाराच्या आसपास असून माजी सरपंच लक्ष्मण किणी , माजी सरपंच वंदेश पाटील, माजी महिला सरपंच सौ.सुनंदा घरत, माजी सरपंच शरद घरत, प्रदीप घरत, राहुल जाधव यांच्या कारकिर्दीत विराथन बुद्रुक येथील चाफेवाडी, नांनदगडी, डोंगरीपाडा, चिखलपाडा, राजनपाडा, वैतीपाडा ,तलावपाडा या गावातील सुशिक्षित युवा तरुणांनी आपल्या भागातील तरुण व्यसनापासून मुक्त राहावेत या उद्देशाने 25 वर्षांपूर्वी विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत बिअरशॉप ,दारू विक्री केंद्र, वाईन शॉप यांना परवानगी न देण्याचा ठराव करून घेतला होता .

या ठरावावर ही ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि विद्यमान सरपंच सौ .अंजली किणी व विद्यमान सदस्य आज- तगायत कायम असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील 477 ग्रामपंचायती पैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या सागरी पोलीस ठाणे हद्दीतील गावठी दारूवर रोखठोक कारवाईमुळे विराथन बुद्रुक ही ग्रामपंचायत एकमेव लाडकी अशी ग्रामपंचायत आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये आजही गावठी दारू, बिअर शॉप दारू विक्री केंद्र वाईन शॉप
मुक्त असलेली ही पालघर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे.



