महाराष्ट्र

टणु येथे शिवजयंतीनिमीत्त राजा शिव छत्रपती फेस्टिव्हल भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी

टणू येथील जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजयंतीनिमीत्त राजा शिव छत्रपती फेस्टिव्हल भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संचालक राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय गटातील विजेते कंसातील नावे बक्षिस देणारांचे आहे.

प्रथम क्रमांक :- गौरी रमेश कांबळे- ७००१/- (संतोष दिगंबर मोहिते, गणेश कृषी केंद्र), व्दितीय क्रमांक :- आसावरी विनोद देवकुळे- ५००१/- (अशोक दत्तात्रय बळते), तृतीय क्रमांक :- रिक्तम समंथा ४००१/- (नितीन जयसिंग मोहिते) अशी देण्यात आली.
तसेच खुला गटात : प्रथम क्रमांक :- अक्षय जगताप- ७००१/- (राजेंद्र भिकाजी मोहिते, संचालक), व्दितीय क्रमांक :- कार्तिकी ताकतोडे- ५००१/- (संतोष तुकाराम मोहिते), तृतीय क्रमांक :- उमेश शिंदे- ४००१/- (अमृत सुभाष मोहिते पाटील), तर सात जणांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत मोहिते सर, राजेंद्र मोहिते सर यांनी केले. तर रंगमंचाचे पुजन शौकत तांबोळी पत्रकार यांनी केले.

दोन्ही गटातील कलाकरासाठी विशेष बक्षीसे सचिन भारत जगताप १०००/-, देविदास बाळकू बोडरे १०००/-, किशोर बाळासो जगदाळे १०००/- भरत रामलिंग बळते १०००/- किरण अंकुश मोहिते १०००/- पांडुरंग दत्तात्रय मोहिते १०००/-, जगजीवन श्रीकांत मोहिते १०००/- परीक्षक म्हणून प्रकाश कांबळे, अविनाश शिंदे, भरत साठे, सोमनाथ मोहिते यांनी काम पाहिले. यावेळी मांजरी ( पुणे ) येथील शहिद जवान सौरभ फराटे यांच्या विरपत्नी सोनाली फराटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शिवजयंती निमित्त शिवसृष्टी किल्ला अकलूज येथून ज्योत आणून ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच ह.भ.प राम महाराज अभंग वडापुरी यांचे किर्तन झाले. तसेच राजेंद्र मोहिते सर, सोमनाथ मोहिते, गणेश मोहिते, अभिजीत मोहिते, विनोद मोहिते, बंटी मोहिते आदिंनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button