शहर

पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायत येथे सरपंच संदीप किणी यांचा नेतृत्वाखाली केळवे समुद्रकिनारी स्वच्छता अभियानाला प्रारंभ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायत हद्दीतील केळवे समुद्रकिनारी शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेचे नेतृत्व केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप किणी यांनी केले.आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिन शनिवार दिनांक दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायत हद्दीतील केळवे समुद्र किनारी आयोजित करण्यात आला होता.

या स्वच्छता मोहीमेचा प्रारंभ शनिवारी सकाळी ठीक 10.00 करण्यात आला या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप किणी यांनी केले. या स्वच्छता मोहिमेमध्ये ग्रामपंचायत केळवे कार्यकारणी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ ,आरोग्य कर्मचारी, किनारपट्टी वरील व्यावसायिक, लाईफ गार्ड ,आदर्श विद्या मंदिर स्काऊट गाईड विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेऊन श्रमदान करून ही मोहीम राबवली.

यावेळी स्वच्छता हीच सेवा आणि अखंडित अंगीकारण्याची शपथ सर्वांनी घेऊन स्वच्छतेचा संकल्प केला.

आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिन साजरा करणेकामी सरपंच संदीप भगवान किणी, उपसरपंच राजेश सालकर,, ग्रामविकास अधिकारी दिनकर पांडुरंग मोढवे व ग्रामपंचायत केळवे यांनी उत्तम असे नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button