“अकलुज पोलीस स्टेशनकडील मौजे गणेशगाव शिवारात अनेतिक संबधातुन झालेल्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीस २ तासात केले जेरंबद ”

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मौजे गणेशगाव तालुका माळशिरस शिवारात दिनांक १९/०६/२०२५ रोजी रात्री ०९/००वा. ते दिनांक २०/०६/२०२५ रोजी सकाळी 0७/०० वा.चे दरम्यान सिन्नाप्पा वांकु वाघमोडे वय. ६० वर्षे हे त्यांचे शेतामधील बांधकाम सुरु असलेले नवीन बंगल्यात झोपले असताना आरोपी संतोष वाघ यांने मयत सिनप्पा व शेतमजूर महिला यांचेमध्ये अनेतीक संबंध सुरु असल्याचा संशय घेऊन कोणत्यातरी धारदार हत्याराने डोक्यात, हातावर, पायावर, छातीवर, चेहर्यावर वार करुन जीवे ठार मारले आहे म्हणुन फिर्यादी बाळु सिनप्पा वाघमोडे वय – ४० वर्षे राहणार -गुळवेनगर अकलुज तालुकामाळशिरस यांचे फिर्यादी वरुन अकलुज पोलीस ठाणेस गुन्हा रजिष्टर नंबर ४४७/ २०२५ भारतीय न्याय सहिंता २०२३ चे कलम १०३(१) , ३५२, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील आरोपी नामे संतोष बाळासाहेब वाघ राहणार लवंग तालुका माळशिरस हा गुन्हा करुन फरार झाला होता.सदर घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज नारायण शिरगावकर व अकलुज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री विकम सांळुखे यांनी तात्काळ भेट देवुन सदर आरोपीस पकडणेकरीता पोलीस ठाणेचे सपोनि चौधरी ,सपोनि लंगुटे पोहे/ स्वप्नील गायकवाड पोहे/सुहास क्षीरसागर,पोहे/शिवकुमार मदभावी,पोहे/विकम घाडगे पोहे/राजेंद्र ठोंबरे,पोहे/बागाडे, पोहे/सलगर, पोकॉ/मारकड, पोकॉ/तुका माने देशमुख पोकॉ/प्रविण हिंगणगावकर ,पोकॉ/सोमानाथ माने यांची दोन पथके तयार करुन आरोपी शोध घेण्याचे आदेश दिला सदर पथकाने आरोपीची गोपनिय माहिती काढुन आरोपीला २ तासाच्या आत जेरबंद करुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केलेला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि चौधरी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, स. पो. नि. योगेश लंगुटे, स.पो.नि. गणेश चौधरी, पोहे/ स्वप्नील गायकवाड पोहे/ सुहास क्षीरसागर,पोहे शिवकुमार मदभावी,पोहे विकम घाडगे पोहे राजेंद्र ठोंबरे,पोहे/बागाडे,पोहे/सलगर, पोकॉ/मारकड, पोकॉ तुका माने देशमुख पोकॉ प्रविण हिंगणगावकर ,पोकॉ/सोमानाथ माने चालक महादेव जाधव, शरद आगलावे ,पोहे बबलु गाडे यांनी कामगिरी केली आहे.



