एकता बहुउद्देशीय संस्था व संग्राम सिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने दर्गा मशीद येथे इफ्तार पार्टी संपन्न

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
इस्लाम धर्मात रमजान महिन्यातील( रोजा )उपवास याला अनन्य साधारण महत्व आहे जगाच्या पाठीवर जिथे जिथे इस्लाम धर्माचे नागरिक राहतात तेथे इस्लाम धर्मातील अबाल वृद्ध रोजी राहतात या रोजा मुळे शारीरिक धार्मिक वैज्ञानिक अशी मानव जीवनाला बऱ्यापैकी लाभ होतो शिवाय आपल्या देशात हिंदू मुस्लिम बांधव रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करुन सर्व जगाला एकतेचा संदेश देऊन गुण्यागोविंदाने इफ्तार पार्टी व रमजान ईद साजरी करतात

त्या अनुषंगाने आज विजय चौक अकलूज येथील दर्गाह मशिदी मध्ये एकता बहुउद्देशीय संस्था व संग्राम सिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन- जयसिंह मोहिते पाटील ,सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री -धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच -किशोर सिंह माने पाटील,

अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक- दीप रत्न गायकवाड ,अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी -दयानंद गोरे , हाजी आदम भाई तांबोळी, उत्कर्ष शेटे ,तात्या आसबे, विशाल शेटे, आणि या पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते ,

तसेच उपस्थित मान्यवरांनी या इफ्तार पार्टीचा आस्वाद व आनंद घेतला याप्रसंगी एकता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जावेद बाबा तांबोळी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

ही इफ्तार पार्टी यशस्वीरित्या पार पडण्याकरिता युन्नुस जमादार, सद्दाम जमादार ,जब्बार दादाभाई तांबोळी , नियाज भाई शेख ,युनूस शेख ,जब्बार मुजावर, रियाज तांबोळी ,आदिनी परीश्रम घेतले.



