आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या मका खरेदी ऑनलाईन नाव नोंदणी प्रारंभ

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9730 867 448
मका खरेदीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरु
रब्बी हंगाम सन 2022-2023 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या मका या पिकाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरु झाली असून कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज व नातेपुते मध्ये मका खरेदीसाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे अवाहन बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी केले दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजार समितीचे केंद्र सुरू करण्याची नियोजन केले आहे.
त्यानुसार शासनाच्या निर्देशान्वये शेतकऱ्यांना नोंदणी करून मका आणावी लागणार आहे नाव नोंदणीसाठी रब्बी हंगाम 2022-2023 या वर्षातील मका या पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा,बँक पासबुक,आधार कार्ड यांच्या झेरॉक्स ही कागदपत्रे आणावी नाव नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती,अकलूज व नातेपुते तसेच शेतकरी खरेदी विक्री संघ अकलूज यांच्याकडे संपर्क साधावा असे अवाहन बाजार समिती सचिव राजेंद्र काकडे यांनी केले आहे.



