महाराष्ट्र

तामलवाडी ता. तुळजापूर येथे दि.14/03/2023 रोजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन..

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

तामलवाडी ता. तुळजापूर येथे मंगळवार दि.14 मार्च 2023 रोजी दुपारी 12- 30 वा. ई.पी.एस.१९९५ या पेन्शन योजनेमधील एस.टी.महामंडळ, वीज महावितरण, सहकारी सुत मिल, साखर कारखाने, जिल्हा सहकारी बॅंक, जिल्हा दुध संघ, खाजगी को.आप.बॅंका, खाजगी इंजि.काॅलेज, औद्योगिक कारखाने, राज्यातील सर्व महामंडळ,व सर्व उद्योगातील पेन्शनर कामगारांचा पेन्शन वाढी बाबत आॕनलाईन फाॅर्म भरणे,

तसेच 26(6),11(4),1183 हे विकल्प फाॅर्म भरणे आणि 3 A चे फाॅर्म परिपत्रक व मे.मद्रास हायकोर्टाचा पेन्शन वाढी संबंधी निकाल तसेच ई.पी.एफ.ओ.चे परिपत्रक या सर्व बाबतीत पेन्शनर कामगारांना कायदेशीर माहिती व मार्गदर्शन संघटनेचे राष्ट्रीय विधी सल्लागार इंजि.दादा झोडे साहेब नागपूर हे करणार आहेत.


या मेळाव्याचे उद्घाटक धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर ( दादा)साहेब यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणुन तामलवाडीच्या सरपंच नुरबानू सिकंदर बेगडे, .चंद्रकांत घाटगे, एस.टी.कामगार अधिकारी,मा.राजेंद्र गाढवे, निवृत्त कार्य.अभियंता, मा.गुंडप्पा गायकवाड, बालाजी अमाईन्स कामगार संघटना,शाहीर गायकवाड, कटारे मिल कामगार संघटना. पत्रकार..संतोष मगर, .आप्पासाहेब गायकवाड, .अविनाश गायकवाड, .सर्जेराव गायकवाड आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


तरी सर्व ई पी एस पेन्शन धारकांना ही शेवटची संधी असल्यामुळे या मेळाव्यात उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष..बसवराज मसुते.सोलापुर जिल्हा अध्यक्ष.हरिभाऊ नरखेडकर, विभागीय सचिव इंजि.शशिकांत ठोकळे.तुळजापुर तालुका अध्यक्ष. .भगवानराव मुनेश्र्वर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button