शहर

प्रशासनाने ऊजनी धरण परिसरातील वीजपूरवठा आठ तास करून शेतकऱ्यांना दिलासा दयावा – युवा नेते शंभूराजेजगताप संचालक , कृषी उत्पन्न बाजार समिती , करमाळा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उजनी धरण जेमतेम साठ टक्के भरले . प्रशासनाला या पाण्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागली . गतवर्षी प्रशासनाने प्रथम प्राधान्य नागरिक व पशुधनास पिण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी त्यानंतर शेती व उदयोग धंदयासाठी असे नियोजन केले . सदर पाणी वापरा सह कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनातून झालेल्या नैसर्गिक घटीतून उजनी धरणाच्या पाण्याची पातळी मागील ४७ वर्षात एवढे मायनस मध्ये(निचांक्कावर) पहिल्यांदाच गेली. त्यामुळे चालु वर्षाचा पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी टिकले पाहिजे या उद्देशाने प्रशासनाने उजनी धरण परिसरात २ तासाची वीज कपात करून ८तास असणारी वीज ६ तासावर आणली . या परिसरात ऊस व केळी सारखी पिके मोठ्या प्रमाणात आहेत या पिकांना पाणी भरपूर व दाट लागते .

जुन च्या पहिल्या पंधरवड्यात या परिसरात चांगला पाऊस झाला पण सध्या दमदार पाऊस पडताना दिसत नाही . त्यामुळे पिकांना पाणी भरपूर पाणी देणे गरजेचे आहे . धरण पट्टयात चांगला पाऊस झालेला आहे त्यामूळे जरी धरण मायनस मध्ये असले तरी पाणी पातळीत वाढ झाली आहे अजून आख्खा पावसाळा बाकी आहे . गतवर्षी पेक्षा यावर्षी भरपूर पाऊस पडेल अशी शक्यता आहे . त्यामुळे ऊजनी धरण निश्चीतपणे पूर्णपणे भरून ओहोरफ्लो होईल यात शंका नाही . या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने या पट्टयातील केळी , ऊस व इतर खरिप पिकांचा विचार करून या परिसरातील ६ तासाचा वीज पुरवठा पूर्ववत ८ तास करून बळीराजाला दिलासा दयावा असे आवाहन जगताप गटाने युवा नेते तथा कृ .ऊ बाजार समिती चे संचालक शंभूराजे जगताप यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button