विशेष

मुंबईचा फौजदार या चित्रपटात आपली संस्कृती आणि संस्कार जपत केलेला तो अभिनय म्हणजे भावी पिढीला दिशादर्शक – महेश बजरंग कोळेकर

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा। या गाण्याच्या ओळी कानावर पडतात मग आठवतो तो मराठी चित्रपट “मुंबईचा फौजदार”. यामध्ये रंजना मॅम आणि रवींद्र सर या दोघांनीही अप्रतिम अशी भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटातील नायिका म्हणजे रंजना मॅम यांची गावाकडची गावंढळ भाषा की मनाला भावून जाते. अस्सल मराठी ते देखणं शंभर खणी देखणं रूप आणि ते सौंदर्य मनाला थेट भावत. चित्रपटातील नायक म्हणजेच रवींद्र सर यांचा रुबाबदारपणा आणि बोलण्यातील लकब हजरजबाबीपणा आणि एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर म्हणून त्यांची असणारी चित्रपटातील ओळख. रंजना मॅम यांची ग्रामीण भागातील संस्कृती विषयी असणारी मनातील आस्था आणि नवरा व बायकोच असणार पवित्र नात यामध्ये साधलेला साधा सरळ अभिनय किती मनाला हुरहूर लावून जातो.

रंजना मॅम यांचं ते अस्सल मराठी देखणं रूप आणि आजच्या मराठी चित्रपटातील नायिका यांच्या बाबतीत विचार करायचा गेला तर जमीन अस्मानाचा फरक दिसून येईल. चित्रपटात रंजना मॅम यांनी कुठेही अंगप्रदर्शन केलं नाही, अश्लील चाळे नाहीत, अगदी जस जगायला हवं, आपली संस्कृती, संस्कार आणि सर्वात महत्वाचं ग्रामीण भागातील निखळ स्वच्छ मनाचं जीवनक्रम मांडण्याचा केलेला त्यांनी सर्वोच्च प्रयत्न म्हणजे या चित्रपटाच यश होय. पण आताचे मराठी चित्रपट आपण पाहतो अहो पाहतो कुठले फक्त डोळ्यांनी पाहतो मनापासून घरी बसून आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन नाही पाहू शकत आपण ते चित्रपट किती अश्लिल भाषा, अश्लील वागणे आणि अंगप्रदर्शन आणि घाणेरडे प्रकार, ना कोणत्या संस्कृती च जतन ना कोणता संस्कार ना कोणता आदर्श काहीच नाही फक्त पैसे कमविण्यासाठी काढलेला चित्रपट आणि प्रसिद्धी साठी केलेली भूमिका एवढंच फक्त पाहायला मिळत त्यात.

आणि गाणी तर असली बापरे काहीच अर्थ नाही त्यात, ना ताल ना सूर. आणि दुसरीकडे चित्रपटातील नायक रवींद्र सर यांचा बोलण्यातील,वागण्यातील रुबाबदारपणा आणि एक कर्तव्यनिष्ठ पोलिस कसा असावा याच एक उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. आजच्या तरूणाई ने विचार करायला हवा. की कोणते चित्रपट पहायचे कोणते नाहीत पाहायचे , कोणाला आपला आदर्श मानायचे, कोणती गाणी ऐकायची कोणती नाहीत ऐकायची. चित्रपटात सासऱ्याची पार पाडणे आणि प्रत्यक्षपणे सासरा असणे यात खूप फरक आहे. तुम्हाला तो डायलॉग आठवतो जेव्हा रवींद्र सर रंजना मॅम यांना घरामधून बाहेर हाकलून देतात तेव्हा रंजना मॅम या आपल्या माहेरी न जाता किंवा माहेरच्या कोणालाही न सांगता किंवा भांडण न करता थेट आपल्या सासरी जातात.

पण आता याउलट चित्र पाहायला मिळत की, लगेच कॉल, मेसेज, भेट आणि भांडण एकाच दोन करून माहेरच्यांना सांगून आताची पिढी मोकळी होते अरे पण पुढचं जीवन काय आई वडिलांच्या इज्जतीच काय? संसाराच काय? कसला ही विचार करत नाहीत. त्यांच्यातरी काय चूक कारण रंजना मॅम यांना समजून घेणारे चित्रपटातील सासरे आणि मुलगी ही सासरी आल्यानंतर सासऱ्याने सुनेची बाजू ही स्वतःच्या मुली प्रमाणे घ्यायची असते असे म्हणणारे आणि तस वागणारे आणि सुनेला मुलाप्रमाणे सांभाळणारे समजून घेणारे सासरे तरी आता राहिलेत कुठं. आपला मुलगा आणि सून एकत्रित यावं म्हणून किती तो जीवाचा अट्टहास नाटक आणि बरच काही.

पण आता घरोघरी नवरा बायको मध्ये फूट पाडणारे लोक मात्र नक्की पाहायला मिळतात. याच चित्रपटातून आणि नायिका रंजना मॅम यांच्या अभिनय कलेचा देखील खूप मोठा देखणा असा आविष्कार पाहायला मिळतो. आपली संस्कृती आणि संस्कार जपत जपत केलेला तो अभिनय आजही जशाच तसा प्रत्येक इथल्या मराठी माणसाच्या मनावर कोरून ठेवलेला आहे. ती तुळशी बद्दल असणारी आस्था, सौभाग्याच लेन कपाळावरील ते लालभडक कुंकू आणि गळयात असणार मंगळसूत्र, बोरमाळ आणि कानात ते फुल झुब किती ते अस्सल मराठी सौंदर्य. आजही हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा हे गाण्याचे बोल कानावर पडतात मन थेट सागरी किनाऱ्यावर जाऊन पोहचत पण आजच ते सागरी किनाऱ्यावरच रूप सुद्धा बदलेल आहे. तिथं प्रेम कमी पण अश्लिलपणा , अंगप्रदर्शन , स्वार्थी नाती या गोष्टी जास्त पाहायला मिळतात.

काहीपण म्हणा पण या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि संपूर्ण कलाकार आणि हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले मेहनत घेतली त्या सर्वांना हा महाराष्ट्र आणि इथला प्रत्येक माणूस कधीही विसरणार नाही एवढं मात्र नक्की. खरंच आज पुन्हा एकदा मुंबईच्या फौजदाराकडे रवींद्र सर आणि रंजना मॅम आणि संपूर्ण चित्रपटाची आठवन येतेय म्हणून तक्रार करावी वाटत आहे.

लेखक- महेश बजरंग कोळेकर
संपर्क क्रं – ९५७९२२८३४७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button