महाराष्ट्र

254 माळशिरस (अ जा) विधानसभेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक “24 च्या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन 254 माळशिरस (अ जा) विधानसभा मतदार संघ निवडणुक कामी दिनांक 22/10/”24 ते 29/10/”24 या कालावधी मध्ये सकाळी 11 : 00 ते दुपारी 03 : 00 वाजे पर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी 254 माळशिरस (अ जा) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी,माळशिरस विभाग,सुजयनगर,01अकलूज यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील…

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीत,नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवाराने किंवा त्याचे एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहुन नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे…

एका उमेदवारास एका विधानसभा मतदार संघात जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील,नामनिर्देशन पत्र दाखल करताना कार्यालयापासून 100 मी अंतरामध्ये वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही…

नामनिर्देशन पत्र दाखल करताना एका उमेदवाराला 3 पेक्षा जास्त वाहनांचा समावेश करता येणार नाही,या साठी संबंधित वाहनांना कार्यालयाचा परवाना असणे आवश्यक आहे,तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारा सह केवळ 4 व्यक्ती च उपस्थित राहु शकतात…

उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल करताना फॉर्म 26 मधील शपथ पत्र दाखल करणे आवश्यक आहे,सदरचे शपथ पत्र हे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लिक किंवा मा उच्च न्यायालयाने शपथ पत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांच्या समोर केलेली असणे बंधनकारक आहे…

तसेच शपथ पत्राच्या प्रत्येक पानावर उमेदवाराची स्वाक्षरी आणि नोटरीचा शिक्का असणे बंधनकारक आहे,सदरचे शपथ पत्र हे 500 रू स्टॅम्प वर द्यावयाचे आहे,नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवाराने ठरवुन दिलेल्या 2 से मी X 2.5 से मी आकाराचे अलीकडील काळातील मा निवडणुक आयोगाने दिलेल्या निकष प्रमाणे असलेले छायाचित्र चिकटवावे,नामनिर्देशन पत्रा सोबत अनामत रक्कम रू 5000/भरावयाची आहे,निवडणुकीसाठी उमेदवारास स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button