महाराष्ट्र

भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी हज उमराह यात्रे साठी निघालेल्या अस्लम सय्यद परिवाराचा केला सन्मान

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मुस्लिम धर्मामध्ये हज यात्रा ही एक पवित्र यात्रा मानली जाते प्रत्येक मुस्लिम बांधवांचे स्वप्न असते की आयुष्यामध्ये एकदा तरी हज यात्रा करावी परंतु हे भाग्य सहजा सहजी लाभत नाही म्हणून मुस्लिम समाज बांधव हे हज उमराह करण्यासाठी प्रयत्न करत असतात उमराह करण्यासाठी देखील अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते.

अशाच बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षा नंतर अकलूजचे अस्लम सय्यद यांना देखील हज उमराह करण्याची संधी आली ,या यात्रेला त्यांच्यासह त्यांचे परिवारातील त्यांची आई व दोन बंधू जाणार असल्याची माहिती भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना कळताच त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी जमिरभाई चौधरी यांना निरोप दिला की अस्लमभाई व त्यांच्या परिवारातील हज यात्रेस निघालेल्या सर्वांना आपल्या वाड्यावर घेऊन या भैय्यासाहेब यांचा निरोप मिळताच त्यांचे विश्वासू व अत्यंत जवळचे सहकारी अस्लम सय्यद, हे त्यांच्या आई बेगम सय्यद, बंधू रहीम सय्यद व सलीम सय्यद, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाड्यावर पोहचताच त्यांचा भैय्यासाहेबांनी हार ,शाल ,श्रीफळ देऊन सन्मान केला व हज उमराह यात्रेसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी राजसिंह शंकरराव मोहिते पाटील हे देखील आवर्जून उपस्थित होते त्यांनी ही सय्यद परिवाराला हज उमराह यात्रेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी अल्लाह चरणी दुवा करा असे त्यांनी आवर्जून सांगितले.

उमराह आणि हजमध्ये काय फरक आहे?
उमरा

उमरा ही मक्का, हिजाझ, सौदी अरेबियाची इस्लामिक तीर्थयात्रा आहे, जी मुस्लिमांनी वर्षाच्या कोणत्याही वेळी केली जाऊ शकते, इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेनुसार विशिष्ट तारखा असलेल्या हजच्या उलट. अरबी भाषेत ‘उमराह’ म्हणजे “लोकसंख्या असलेल्या ठिकाणी भेट देणे.” शरियामध्ये, उमरा म्हणजे काबाच्या भोवती तवाफ करणे आणि इहराम (पवित्र अवस्था) धारण केल्यानंतर सफा आणि मारवाह दरम्यान सई करणे.

एकदा जमिनीवरून प्रवास करताना आणि झूल-हुलाफा, जुहफा, कर्नू-ल-मनाझिल, यलम्लाम, झात-इ-इरक, इब्राहिम मुर्सिया किंवा अल-हिलमधील एखादे ठिकाण जसे मिकात पार केल्यावर इहराम पाळणे आवश्यक आहे. हवाई प्रवाश्यांसाठी भिन्न परिस्थिती अस्तित्वात आहे, ज्यांनी एकदा मक्का शहराच्या विशिष्ट परिमितीत प्रवेश केल्यानंतर इहराम पाळला पाहिजे. याला कधीकधी ‘लहान तीर्थ’ किंवा ‘कमी तीर्थयात्रा’ म्हटले जाते, हज ही ‘प्रमुख’ तीर्थयात्रा आहे जी परवडणाऱ्या प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य आहे. उमरा अनिवार्य नाही परंतु अत्यंत शिफारसीय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button