महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 जिल्हा पोलीस दला मधून 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमामध्ये पालघर जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या राज्य सरकारचा 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमात पालघर पोलीस दलाने 90.29% मिळूवून राज्यपोलीस विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात सदर 7 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमामध्ये वेबसाईट, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोई सुविधा, आर्थिक व औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याद्वारे लोकांच्या आणि अडचणी सोडवायच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून पोलिस विभागात सर्व पोलीस स्टेशननि कार्यक्रम आपल्या आपल्या विभागात राबवून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
पालघर जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करताना वेबसाईट अद्ययावत करून प्रत्येकाला ती वापरणे सोपे जावे या दृष्टिकोनातून बनवण्यात आली आहे. नागरिकांसाठी चाट सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम, अल बेस्ट चार्ट बोर्ड, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली , कार्यालयीन कामकाजामध्ये एआयचा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय ॲप्लीकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेकडून 100 दिवसांचे मुल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये पालघर पोलीस दलास 100 गुणांपैकी 90.29 गुण प्राप्त झाले आहेत. त्यामुळे 100 दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्टातील एकूण 34 जिल्हा पोलीस दलामधून पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अगोदर देखील 50 दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता.
सदरचा कार्यक्रम पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अथक परिश्रमातून यशस्वीरित्या राबवला आहे.



