तीर्थक्षेत्र अजमेर येथून आणलेली पवित्र चादर लुमेवाडी येथील हाजी हाफीज फतेह मोहम्मद जोधपुरी यांच्या समाधीवर बुधवारी माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अर्पण करण्याचे आयोजन

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अजमेर येथून आणलेली पवित्र चादर लुमेवाडी येथील सोफी संत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी रहमतुल्ला अलै यांच्या समाधी (अस्ताना )वर अर्पण करण्याचा कार्यक्रम बुधवार दि.7 जुन 2023 रोजी सायंकाळी 7/30 वा. लुमेवाडी ता.इंदापूर जि.पुणे येथे हुजुर सुफी अब्दुल्ला इब्राहिम रहमतुल्ला अलै यांच्या कृपेने व हजरत अल्हाज सय्यद वली चांँद पाशा आवाटी आणि सय्यद अहमद रजा उर्फ आरिफ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असून याप्रसंगी फातेहा ख्वानी होऊन त्यानंतर( लंगरे आम) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

महाप्रसादानंतर सुप्रसिद्ध कव्वाल अझीम नाझा यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे विशेषतः मोईन अली आणि इबादत अली यांच्या ( आकिका खाना) चे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविक बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बागेची वाडी ग्रामपंचायतचे सदस्य व आरमान चायनीज सेंटरचे मालक रियाज भाई शेख आणि मोहम्मद फारुख शेख यांनी केले आहे.



