पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक बागवान जमातीच्या अध्यक्ष पदी सांगलीच्या असलमभाई जी मोहम्मद यांची निवड…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक बागवान जमातीच्या बागवान बिरादरीची बैठक इचलकरंजी बागवान जमातने “बागवान हॉल” येथे आयोजित केली होती…
सदरची बैठक हाजी शफीभाई हाजी चांदभाई बागवान यांच्या निगराणी मध्ये घेण्यात आली,या वेळी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक येथील बागवान समाजातील नवीन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर कऱण्यात आल्या…
या वेळी अध्यक्ष पदी सांगलीचे असलमभाई गुलामभाई बागवान (जी मोहम्मद) तर उपाध्यक्ष पदी यासीनभाई बालमभाई बागवान (कोल्हापूर) आणि शकीलभाई शौकतभाई बागवान (निपाणी) या दोघांची निवड करण्यात आली…
तसेच सेक्रेटरी पदी अन्वरभाई गुलाबभाई बागवान (कराड) यांची तर सह सचिव पदी (1) सलीमभाई कुतुबुद्दीन बागवान (कुरुंदवाड) आणि (2) सईदभाई नजीरभाई बागवान (कराड) या दोघांची निवड करण्यात आली,खजिनदार पदी समीरभाई फकीर मोहम्मद बागवान (सांगली) यांची हि निवड करण्यात आली…
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक बागवान जमातीच्या सद्स्य पदी खालील मान्यवरांची निवड करण्यात आली…
(1) मोहम्मद शफी चांदभाई बागवान (मिरज)
(2) मोहम्मदअली फरीद बागवान (सांगली)
(3) मुनीर गुलाब बागवान (कराड)
(4) रफिक दस्तगीर बागवान (कोल्हापूर)
(5) कैश शौकत बागवान (इचलकरंजी)
(6) परवेज सिकंदर बागवान (सातारा)
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक बागवान जमातीच्या नवीन झालेल्या संघटन समितीला टाइम्स 9 न्यूज चे अकलूज प्रतिनिधी आमीर बागवान (मोहोळकर) यांनी भ्रमण ध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या…



