महाराष्ट्र

उपळवटे च्या सरपंचाने केली पोलीस संरक्षणाची मागणी

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448

शहरी भागात अतिक्रमणाचा प्रश्न वाढत असतानाच हाच मुद्दा ग्रामीण भागात ही प्रकाशाने जाणवत आहे उपळवटे तालुका माढा येथे चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या शेजारीच प्रकाश गोसावी यांनी हॉटेल व पान टपरी गोवा गुटखा कोल्ड्रिंक्स विकण्याचे दुकान महाभागाने थाटले आहे उपळवाटे गावात कोणत्याही दडपशाहीला न जुमानता उपळवाटे गावचे विद्यमान सरपंच राहुल घाडगे साहेब यांनी मोठे धाडस दाखवून स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा ठराव घेऊन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीने पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना पत्र दिले कि प्रकाश गोसावी यांनी पाणी पुरवठा विहीरीजवळ पान टपरी व हॉटेल टाकले आहे

येथील सर्व घाण पाणीपुरवठ्याच्या विहिरीमध्ये जाऊन पडत आहे सदर अतिक्रमणामुळे विहिरीतील पाणी दूषित होऊन गावातील लोकांना आरोग्याच्या धोका निर्माण होऊ शकतो आसे उपळवटे चे सरपंच राहुल घाडगे म्हणाले आणि अतिक्रमण काढण्यासाठी संरक्षणाची मागणी केली आहे या गोष्टीसाठी राहुल घाडगे यांचं उपळवाटे गावात कौतुक होत आहे तर सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणारे हे दुकान पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीच्या शेजारी असणारे हे हॉटेल व पान टपरी आता पोलीस संरक्षण मिळवून कधी निघणार याची वाट उपळवाटे ग्रामस्थ पाहत आहेत त्याच वेळेस खऱ्या अर्थाने उपळवाटे गावातील ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही यानिमित्ताने हे अतिक्रमण काढले तर उपळवाटे ग्रामस्थांनी सरपंचाची मिरवणूक हत्तीवरून काढण्याचे ठरवलेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button