शहर

पालघर केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील पालक मेळाव्यात पालकांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील पालकांचा मेळावा आयोजित करून मुलांच्या सुरक्षेतेसाठी आणि त्यांना गुन्हेगारी पासून मुक्त राहण्यासाठी मंगलधाम हॉल शितलादेवी मंदिर केळवा रोड येथे मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या पालक मेळाव्याला केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत दर्शविली होती.

या उपस्थित पालकांना पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या जनसंवाद अभियाना अंतर्गत सायबर गुन्हेगाव मुक्त मोहिमेविषयी सविस्तर मार्गदर्शन व माहिती देऊन गुन्हेगारी आणि धोक्यापासून सावध राहणे, सायबर गुन्हे आणि सुरक्षा, मुलांची संवाद साधण्याची योग्य पद्धत, मुलांच्या समस्या वर तोडगा, पालक आणि शिक्षक यांचे संबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, बालकांची सुरक्षितता, बालविवाह, डायल 112, तसेच पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट फेसबुक इंस्टाग्राम फॉलो करण्याचे आवाहन केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button