मुजीब खलिफा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूकी साठी मार्केट यार्डातील प्रसिद्ध व्यापारी मुजीब भाई खलिफा यांनी आडते व व्यापारी मतदारसंगातून अर्ज दाखल केला असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात २५ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शुक्रवारी दिनांक 28 मार्च रोजी मुजीब भाई खलिफा यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत अर्ज दाखल केला…
मार्केट यार्डतील सर्व शेतकरी,व्यापारी,सभासद,कामगार वर्ग यांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणुन मुजीबभाई खलिफा यांची ओळख आहे,संघटनेने अधिकृतरित्या संधी दिल्यास,दिलेल्या संधीचा सोनं करेन असे आश्वासन खलिफा यांनी यावेळी दिले…
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सह नारायण माशाळकर,सरफराज शेख,श्रीधर काळे,उमेश यादवार,शंतनू बनाजगोले,गणेश यारगले,योगेश दुलंगे,गौरीशंकर नागणसुरे,मुन्ना बिराजदार,जगदीश वळसंगे,साबीर इनामदार,समर्थ माशाळकर,अफजल सौदागर,सादिक इनामदार,राजकुमार मंडोले,इम्रान MMM,अजीम खलिफा,आसिफ बागवान,सुहेब खलिफा आणि मार्केट यार्ड व्यापारी संघ खलिफा मित्र परिवार उपस्थित होते…



