जव्हार कासटवाडी गावात शेतकरी लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक- _7030516640
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी मौजे कासटवाडी ह्या गावात पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून शेतकरी लोक सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.
या बंधाऱ्याचा फायदा या गावातील शेतकऱ्यांना होणार असून वाहणारे पाणी अडवले जाणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला,फळभाज्या लागवड करण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे व यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण होईल यावेळी लाभार्थी शेतकरी, ग्रामपंचायत सरपंच कल्पेश विनायक राऊत, ग्रामविकास अधिकारी, ग्रापपंचायत सदस्य व पर्यवेक्षक अहिरे सर, दाभेराव सर कृषि सहाय्यक नितीन पाटील, सुमित महाले, विकास भदाणे, सुनील, महाले, विनायक जाधव, संजय डोके, भरत कोरडे, राम पाटोळे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित या भागातील शेतकऱ्यांना हरभरा बियाणाचे सुद्धा वाटप करण्यात आले.



