माळशिरस पिरळे येथिल स्थावर मालमत्तेचा दिनांक 12 03 2025 रोजी होणार जाहीर निलाव.

प्रतिनिधी: महेश मोहिते
मो. 8380848673
तालुका माळशिरस तहसील कार्यालयाचे तहसीलदार त्यांनी मा.कामगार न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे माळशिरस तहसील कार्यालय येथे दिनांक 17 2 2025 रोजी बेमुदत अमरन उपोषण करण्यात आले होते. उपोषण करते श्री. रामदास जाधव सौ. अलका जाधव यांनी अमरन उपोषण संलग चार दिवस करण्यात आले .
या उपोषणाचा धसका घेऊन मा .तहसीलदार साहेब यांनी पिरळे येथील श्री.रघुनाथ केरू वाघ रा. पिरळे व श्री.संदीप रघुनाथ वाघ रा. पिरळे यांच्या स्वतःच्या मालकीच्या आश्रम शाळा व स्थावर मालमत्ता याचा जाहीर निलाव करण्याचे पत्र जाधव यांना देण्यात आले .निलावा दरम्यान ठेवण्यात आलेली निलावातील स्थावर मालमत्ता खालील प्रमाणे गावाचे नाव पिरळे. जमीन गट 1)नंबर 258 /5 क्षेत्र 05 गुंठे शासकीय मूल्यांकन 450000 रुपये 2)265/1 क्षेत्र 19 गुंठे शासकीय मूल्यांकन 439185 रुपये 3)258/4 क्षेत्र 21गुंठे शासकीय मूल्यांकन 485415 रूपये 4)265/3 क्षेत्र 21 गुंठे शासकीय मूल्यांकन 485415 रुपये 5)925 क्षेत्र 37.17 चो.मी. शासकीय मूल्यांकन 647650 रुपये एकूण रक्कम =2507665 इतके असून तरी माळशिरस तालुक्यातील व इतर भागातील नागरिकांनी या निलावास दि.12 03 2025 रोजी पिरळे येते मालमत्ता प्रत्यक्ष स्थळी ज्या नागरिकांना निलावात भाग घ्यायचा आहे.
त्यांनी निलावास हजर .रहावे पत्रामध्ये कोणतीही वेळ दिलेली नाही. तरी ऑफिस टाईम मध्ये हजर राहावे. असे तहसीलदार साहेब यांच्या दिलेल्या पत्राद्वारे सांगण्यात येत आहे आहे .या निलावामध्ये अटी व शर्ती महाराष्ट्र जमीन महसूल च्या वसुली बाबत अधिनियम 1967 प्रमाणे लागू आहेत .